वाणिज्य

RBI च्या ‘या’ बँकेच्या ग्राहकांना सूचना; फक्त 5 हजारापर्यंत रक्कम काढता येणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । ग्राहकांच्या पैसे काढण्यासोबतच, RBIने बँकेला कर्ज देण्यास करण्यास बंदी घातली आहे. यासाठी बँकेला आता आरबीआयची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. 8 एप्रिल 2022 पासून रिझर्व्ह बँकेने हे सर्व निर्बंध लागू केले आहेत.

5,000 पेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंदी

आर्थिक शिस्त बिघडल्याने आरबीआयने हा निष्कर्ष काढला आहे. बेंगळुरूच्या शुश्रुती सौहर्दा सहकारी बँक नियामिता (Shushruti Souharda Sahakara Bank Niyamita)वर निर्बंध लादले आहेत आणि बँकेच्या ग्राहकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यास बंदी घातली आहे. त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून 5,000 रुपयांपेक्षा जास्त रोख काढू शकणार नाहीत.

सहा महिन्यांची बंदी

आरबीआयने गुरुवारी निर्देश जारी करून पुढील सहा महिन्यांसाठी बँकेवर बंदी घालण्याची माहिती दिली. सहा महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सूचना दिल्या जातील. सूचनांनुसार, बँकेला गुंतवणूक करण्यापूर्वी, पेमेंट करणे, नवीन ठेवी स्वीकारणे आणि मालमत्तांची विक्री करण्यापूर्वी आरबीआयची परवानगी घ्यावी लागेल.

Related Articles

Back to top button