⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver : सोने-चांदीने पुन्हा घेतली मोठी उसळी ; किमतींनी गाठला ‘हा’ टप्पा..

Gold Silver : सोने-चांदीने पुन्हा घेतली मोठी उसळी ; किमतींनी गाठला ‘हा’ टप्पा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत मोठी चढ-उतार सुरु आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झाली. सोने आणि चांदी चांदी पुन्हा विक्रमी पातळी गाठणार असं वाटत होते. मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीत घसरण दिसून आली. परंतु आता सोने-चांदीची चमक पुन्हा वाढू लागलीय. आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर पुन्हा ६० हजारांवर गेला आहे. Gold Silver Rate Today

जळगावातील सोन्याचा आजचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५५००० रुपयावर गेला. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ५४५०० रुपयावर होता. त्यात आतापर्यंत ५०० रुपयांची वाढ झालेली दिसतेय. तसेच सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ६०,३०० रुपयांवर आला आहे. यापूर्वी काल सोन्याचा दर ५९५०० रुपयावर होता. त्यात गेल्या २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत २४ तासात तब्बल ६०० ते ८०० रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.

चांदीचा दर?
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास जळगावात सध्या विनाजीएसटी ७६००० रुपये प्रति किलोवर गेला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात चांदीचा दर ७५००० पर्यंत होता. एकाच दिवसता त्यात १००० ते १५०० रुपयाची वाढ झालेली दिसतेय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
आज गुरुवार मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोने ११० रुपयांनी वाढून ५९,५५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर ५०० रुपयांनी वाढून ७५,८१७ रुपयावर व्यवहार करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.