मिनी गोल्फ खेळात ऋषिकेश महाजनची निवड

एप्रिल 9, 2022 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला विज्ञान महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान वर्गाचा विद्यार्थी ऋषिकेश ज्ञानेश्वर महाजन याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात मिनी गोल्फ या खेळात निवड झाली आहे.

rushikesh

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा जयपूर (राजस्थान) येथे १६ ते २० एप्रिलदरम्यान स्पर्धा होणार आहेत. या मिनी गोल्फ स्पर्धेचा संघ १३ एप्रिल रोजी सायंकाळी जयपूरला रवाना होणार आहे. ऋषिकेषला अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, क्रीडा संचालक डॉ. सचिन झोपे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. के. जी. कोल्हे, डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. एस. आर. इंगळे, डॉ. पी. आर. गवळी, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पाटील उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now