गजानन महाराज मंदिरात उद्या श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन

एप्रिल 9, 2022 12:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । बांभोरी येथील श्रीगजानन महाराज बहुउद्देशिय संस्थेत उद्या दि १० एप्रिल रोजी श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गजानन महाराज

माल्यार्पण, प्रतिमापूजन, नवमी होम हवन यासह गुरुदत्त भजनी मंडळाचा संगीतमय भजनाचा कार्यक्रमासह रामजन्माेत्सव होईल. आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, पुनम खैरनार, रघुनाथ वाघ, सुधा काबरा उपस्थित राहतील. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अण्णा महाराज पाटील यांनी कळवले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now