⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय, ग्राहकांना मिळाला दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । भारतीय तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाहीय. आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल जैसे थे आहे. एप्रिल महिन्यातील हा तिसरा दिवस आहे, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता दर स्थिर राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, 22 मार्चपासून लिटरमागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले तरी दर विक्रमी पातळीवरच आहेत. याआधी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर १२१. ६९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटरचा दर १०४. ३४ रुपये इतका आहे.

देशभरातील इतर बड्या शहरातील दर

तर मुंबईत आज शुक्रवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १२०.५१ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११५.०८ रुपये इतका असून चेन्नईत पेट्रोलचा भाव ११०.८९ रुपये इतका आहे. मुंबईत आज एक लीटर डिझेलचा १०४.७७ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत डिझेल ९६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर १००.९८ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९९.८२ रुपये झाला आहे.