⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | वाणिज्य | अक्षय तृतीयापूर्वी ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात घसरण..जळगावात आता इतका आहे भाव?

अक्षय तृतीयापूर्वी ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात घसरण..जळगावात आता इतका आहे भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । मार्च नंतर एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान फटकेबाजी केली. सर्वकालीन रेकॉर्ड याच महिन्यात नोंदविला गेला. यामुळे ऐन लग्नराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला. मात्र गेल्या आठवडाभरापासून सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोमवारी सोन्याचे दर प्रती तोळ्यामागे ५० रुपयांनी घसरले. ही घसरण मोठी नसली तरी किंमती न वाढल्याचा ग्राहकांना दिलासा आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांवर अक्षय तृतीया सण तोंडावर आला आहे. अनेक जण या दिवशी सोने-चांदीची खरेदी शुभ मानतात. पण गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोने-चांदीच्या दरवाढीने अनेकांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जळगावात सोन्याच्या दराने विनाजीएसटी ७४२०० रुपयापर्यंतचा सार्वकालीन उच्चांक गाठला होता.

मात्र यात काहीसा दिलासा मिळाला असला तरी सध्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जळगावात सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ६६,६८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७२८०० रुपयावर आहे. जीएसटीसह हा दर ७५ हजाराच्या आसपास आहेत. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ८२००० वर विकला जात आहे. जीएसटीसह चांदीचा दर ८४,४६० रुपयांवर आहे.

दरम्यानं, उच्चांकी दरापासून सोन्याचा दर १४०० ते १५०० रुपयांनी घसरले आहे. तर चांदीचा दर जवळपास २००० रुपयांनी घसरली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.