⁠ 
गुरूवार, मे 16, 2024

Ola स्कूटरला टक्कर देण्यासाठी Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२४ । सध्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहन लाँचिंग करीत आहे. यातच बजाज ऑटो आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्यात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन इलेक्ट्रिक चेतक TVS iQube, Ola S1X आणि नवीन Ather Rizzta शी स्पर्धा करेल.

कंपनी सध्या बाजारात उपलब्ध असेया चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा स्वस्त व्हॅरिएंट सादर करणार आहे. या स्वस्त मॉडेलमध्ये काही फीचर्सचा अभाव पाहायला मिळू शकतो. तसेच नवीन मॉडेलच्या डिझाइनमध्येही काही फरक पाहायला मिळू शकतो. कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर करून बजाज ऑटोला बाजारात आपली पकड मजबूत करायची आहे.

किती असेल किंमत?
एका रिपोर्ट्सनुसार, बजाज ऑटोच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे 1 लाख रुपये असू शकते. सध्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.23 लाख ते 1.47 लाख रुपयांपर्यंत आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात स्वस्त स्कूटर 70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

किती मिळणार रेंज?
बजाज ऑटोच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत. नवीन स्कूटरची किंमत कमी होऊ शकते, मात्र याची रेंज चांगली असेल, असं बोललं जात आहे. मात्र कंपनी यामध्ये किती रेंज ऑफर करेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, नवीन एंट्री-लेव्हल चेतक एक हब मोटर आणि लहान बॅटरी पॅकसह येऊ शकते. जेणेकरुन किमती नियंत्रणात राहतील, ज्यामुळे उत्पादकाला किंमत निश्चित करण्यात मदत होईल.