विवाहित महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । जोशी पेठ येथील विवाहित महिलेने राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. फिरदोस बी जुबेर खाटीक असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत शनीपेठ पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, फिरदोसबी या जोशीपेठेत पती जुबेर आणि मुलासह वास्तव्यास होत्या. त्यांच्या मुलाचा पेपर दुपारी ३ वाजता सुटणार असल्यामुळे जुबेर खाटीक हे त्याला घेण्यासाठी शाळेत गेले होते. त्याच दरम्यानात फिरदोसीबी यांनी राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. ही घटना शुक्रवार ८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. जुबेर खाटीक हे मुलाला घेवून घरी परतल्यानंतर त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.