⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गुजरातमधील विजयानंतर नरेंद्र मोदींनी केले जळगावच्या या सुपुत्राचे कौतूक

गुजरातमधील विजयानंतर नरेंद्र मोदींनी केले जळगावच्या या सुपुत्राचे कौतूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ८ डिसेंबर २०२२ | केवळ गुजरात राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा तसंच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर भाजपाने हा विजय मिळवला असला तरी या विजयाचे शिल्पकार जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावच्या सुपुत्राचे कौतूक केले आहे.

गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु असल्याने मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी गांधीनगरमधील भाजपा मुख्यालयात जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत सी आर पाटील यांचे अभिनंदन व कौतूक केले आहे. याचं कारण म्हणजे मोदींचे निकटवर्तीय म्हणून खासदार सी आर पाटील यांची ओळख आहे. यंदा गुजरातमध्ये भाजपाला अ‍ॅन्टीइंम्कबंसीची भीती सतावत होती. दुसरीकडे आपनेही पूर्ण ताकद लावली होती. यापार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी आर पाटील यांनी सुक्ष्म नियोजन करत भाजपाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे.

कोण आहेत सी.आर.पाटील?
गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका पिंप्री अकाराऊत या गावचे रहिवासी आहेत. आजही त्यांचा जळगाव शहारात डी मार्ट ते आरटीओ कार्यालयादरम्यानच्या मार्गावर मोठा बंगला आहे. तेथे ते नियमित येत असतात. जवळपास गेल्या तीस वर्षांपासून ते नवसारीमध्ये कार्यरत आहेत. पाटील २००९ पासून भाजपच्या तिकीटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वाराणसी मतदारसंघाच्या विकासाचा कार्यभार सी. आर. पाटील यांच्यावर सोपवण्यात आला होता. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.

अमित शाह यांच्याकडूनही सी आर पाटील यांचे कौतूक
गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले, असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. अमित शाह यांनीही सी आर पाटील यांचे कौतूक केले आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.