जळगाव लाईव्ह न्युज। ८ एप्रिल २०२२ । विक्रेत्यांद्वारे विना परवानगी वाहनांवर लावलेले भोंगे ध्वनिप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरच्या वतीने करण्यात आली असून त्या आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात ध्वनी प्रदूषणाचा अत्यंत भयंकर त्रास जळगावकराणा होत आहे. त्यातील ध्वनी प्रदूषणाचा एक भाग म्हणून रोज सकाळी सहा वाजेपासून भंगारवाले त्यांची जुनी विना नोंदणी रिक्षा किंवा तत्सम प्रकारातील वाहन ज्या वाहनावर नंबर सुद्धा नसतो, अशी वाहने ज्यांनी पंधरा वर्ष पूर्ण केलेले आहेत. अशा वाहनांना मोठ्या प्रमाणात ते भोंगे लावून रोज सकाळी ध्वनी प्रदूषणाला सुरुवात करतात. सध्या जळगाव शहरात पंधरा ते वीस वाहने मोठ्या भोंग्या वाली फिरत आहेत. ध्वनिप्रदूषणामुळे जळगावातील तरुण ज्यांचे परीक्षा सुरू आहेत, काही वयोवृद्ध आहेत, येणाऱ्या काळात पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात तरुण अभ्यास करीत आहेत.
ध्वनी प्रदूषणामुळे शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात अभ्यासात किंवा कामात व्यत्यय येत आहे.या वाहनधारकांनी भोंगे लावण्याची परवानगी आपल्याकडून घेतली आहे का ? घेतली असेल तर त्या भोंग्याचा आवाज किती डिसेबलप्रमाणे ठेवायला हवेत याची माहिती त्यांना कळावी. त्या वाहनांनी परवानगी घेतलेली नसून अशा वाहनांना बंद करण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळ, राजेंद्र निकम रस्ता आस्थापना व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.