ओटीपी विचारून व्यावसायिकाची दोन लाखात फसवणूक

एप्रिल 8, 2022 1:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करून देण्याचे सांगत ओटीपी विचारून शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

chori onlie jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, जुने मेहरूण येथील रहिवासी मोहद खालीद अब्दुल करीम (वय-३५) हे मेडीकल चालवून आपला उदरनिर्वाह करतात. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ते मेडीकल दुकानावर बसलेले असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करून देतो व पीन जनरेट करून देतो असे त्यांना सांगितले. त्यावर मोहद यांचा विश्वास बसला आणि त्यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितले. त्यानंतर Housing.com या वेबसाईटवरून त्यांच्या क्रेडीटकार्डवरून परस्पर २ लाख १२ हजार १०० रूपयांची रक्कम काढण्यात येऊन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहद खालीद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास दिपक जगदाळे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now