सागर चौधरी यांची इस्रो मध्ये निवड

एप्रिल 8, 2022 12:17 PM

जळगाव लाईव्ह न्युज। ८ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर कोथळी येथील रहिवासी सागर ज्ञानदेव चौधरी याची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली.

sagar

सागर हे कोथळी गावाचे नाव राष्ट्रीय पातळीला आज घेउन गेले आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श मानायला हवा. यासाठी त्याने दोन वर्ष केलेली मेहनत कोथळी ग्रामस्थांनी पाहिलेली आहे. सागर चे तसेच त्याच्या आईवडिलांचे खूप खूप अभिनंदन केले. आज कोथळी ग्रामस्थांच्या तसेच कोथळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सागरचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच पंकज राणे, ग्रा.पं स.योगेश राणे, ग्रा.पं स.उमेश राणे, ग्रा.पं स. मोहन कोळी, बाळाभाऊ विटकरे, विजय चौधरी, योगेश पाटील, गणेश राणे ग्रामसेवक चौधरी अप्पा इत्यादी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now