स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना मिळतो वाव : डॉ. जयप्रकाश रामानंद
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालना मिळण्यासाठी महाविद्यालयात स्पर्धांना महत्व आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी सुरेख मांडणी पोस्टर्स, रांगोळी मधून विद्यार्थ्यांनी केली आहे. शरीर सुदत्रढ ठेवण्यासाठी निर्व्यसनी राहणे व नियमित योग्य व्यायाम करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये जनऔषधवैद्यकशास्र् विभागातर्फे गुरुवारी, 7 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्याच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अधिष्ठाता डॉ.रामानंद बोलत होते. याप्रसंगी मंचावर दोन्ही उपअधिष्ठाता डॉ.मारोती पोटे व डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.योगीता बावस्कर, डॉ.अरुण कसोटे, डॉ.अंजली वासडीकर, डॉ. योगीता सुलक्षणे उपस्थित होते.
डॉ.योगिता बावस्कर यांनी स्पर्धेचा आढावा घेवून जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. सध्याचे पर्यावरण विविध कारणांनी दुषीत होत असून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर रांगोळी व पोस्टर्स स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधून विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
परिक्षकांमधून डॉ.किशोर इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद म्हणाले की, स्वतःचे आरोग्य चांगले राहिले तर आयुष्य सुरक्षितपणे जगता येते. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सांघीक भावना वाढीस लागते. व्यापक हेतू ठेवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागत्रती होते, असेही ते म्हणाले.
रांगोळी स्पर्धेचे परिक्षण डॉ.अंजली वासडीकर व डॉ. योगीता सुलक्षणे यांनी तर पोस्टर्स स्पर्धेचे परिक्षण डॉ.मारोती पोटे व डॉ.किशोर इंगोले यांनी केले.
सूत्रसंचालन जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी तर आभार डॉ.विलास मालकर यांनी मानले. यावेळी डॉ.वैभव सोनार, डॉ.मोनिका युनाती, डॉ.गणेश लोखंडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता डॉ.डॅनियल साजी, डॉ.मनू डेव्हीस, योगेश कुंवर, संदीप माळी, अजय जाधव यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे विजेते
रांगोळी स्पर्धेत प्रथम – राजेश्री राठोड व सहकारी, व्दितीय – हर्षाली निकम व सहकारी, तत्रतीय – गितांजली यादव व सहकारी, पोस्टर्स स्पर्धेत प्रथम – पूजा यादव व सहकारी, व्दितीय – प्रियंका शेळके व सहकारी, तत्रतीय – सुकत्रत धोटे व सहकारी यांनी विजेतेपद पटकाविले.
महाविद्यालयात परिसरात वृक्षारोपण
दरम्यान, सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते वत्रक्षारोपण करण्यात आले. यावेळी दोन्ही उपअधिष्ठाता डॉ.मारोती पोटे व डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.योगीता बावस्कर, डॉ.अरुण कसोटे, डॉ.संदीप पटेल, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ.योगेश गांगुर्डे, डॉ.इम्रान तेली, डॉ.विलास मालकर, डॉ.गणेश लोखंडे, डॉ.योगीता सुलक्षणे, डॉ.श्रीनिवास लोंढे आदी उपस्थित होते.