एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीची कारवाई मागे
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगत परिवहन मंत्री अनिल परब उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी निलंबित व बडतर्फ कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन केले होते. तसेच हजर होणाऱ्या कर्मचार्यांवरील सर्व कारवाया मागे घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार बडतर्फ करण्यात आलेल्या ३७ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. बुधवारपासून हे कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले. एसटी संपदा पाच महिने उलटले असून तरीदेखील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही सुरुवातीला या कर्मचाऱ्यांवर निलंबन व त्यानंतर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती जळगाव विभागात 221 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यातील फक्त ३७ कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले असून त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली आहे.