⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 4, 2024
Home | बातम्या | वाचा.. जळगावकर ‘विनोद’ला कशी सुचली ‘हाई झुमक्या वाली पोर’ची कल्पना

वाचा.. जळगावकर ‘विनोद’ला कशी सुचली ‘हाई झुमक्या वाली पोर’ची कल्पना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । सोशल मिडीयाच्या जगात अहिराणी, खान्देशी गाण्यांचा चांगलाच बोलबाला आहे. अनेक गाण्यांनी लाखो, करोडोंचा टप्पा गाठला असून काही गाण्यांनी तर रसिकांना विशेषतः तरुणाईला वेड लावले आहे. सध्या ट्रेंडिंग असलेले ‘हाई झुमक्या वाली पोर’ (jhumka wali por Song) गाणे मूळ जळगावकर असलेल्या विनोद आणि राणी कुमावत या जोडीने तयार केले असून गाण्याची कल्पना कशी सुचली याचे गुपित विनोदने सांगितले आहे.

अवघ्या काही दिवसात गाण्याने युट्युबवर २ कोटी व्ह्यूजचा टप्पा गाठला असून इन्स्टाग्रामला तब्बल ५ लाखाहून अधिक नेटिझन्सने यावर रिल्स तयार केले आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम, युट्युब शॉट्स, लग्न समारंभ, शाळा, महाविद्यालय स्नेह संमेलनात ‘हाई झुमक्या वाली पोर’ची तुफान धूम आहे. सर्वत्र गाण्याचा बोलबाला झाला असून मुख्य कलाकार निर्माता विनोद कुमावत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आहे.

कोण आहेत या गाण्यातील कलाकार?

या गाण्यातील मुख्य कलाकार विनोद कुमावत आणि राणी कुमावत हे दोघं आहेत. विनोद हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आहे. त्याचं शिक्षण भातखंडी गावात झालेलं आहे. पुढे काही दिवस विनोद कळवणला आपल्या परिवारासोबत राहू लागला. विनोद याला लहान पणापासूनच गाणे गायची, डान्स करण्याची आवड होती आणि तो खानदेश भागातील असल्यामुळे अहिराणी भाषेवर त्याची चांगली मजबूत पकड आहे. मात्र, चांगला प्लॅटफॉर्म मिळत नसल्यामुळे त्याला त्याची कला मांडता येत नव्हती. मात्र, टिक टॉक जेव्हा सुरू झालं त्यावेळेस त्याने आपल्या कलेला वाव दिला आणि अनेक व्हिडिओ केले. ते चांगले हिट झाले.

पुढे विनोद एका कंपनीत काम करून छंद जोपासत होता. अशाच काळात नाशिकमध्ये त्याची राणी सोबत भेट झाली. राणी ही सर्व सामान्य कुटुंबातील आहे. तिचे वडील रिक्षा चालवतात. तर आई शिवणकाम करून घरचा उदरनिर्वाह भागवते. राणीला गाणे गायची, डान्स करण्याची प्रचंड आवड आहे आणि आता हे दोघं ही सोबत अल्बम बनवतात. त्यांची अनेक गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. कर म्हणा लगण आणि हाई झुमल्या वाली पोर ही गाणी तुफान व्हायरल झाली आहेत.

कसं सुचलं हाई झुमक्या वाली पोर गाणं?

अहिराणी भाषेतील या गाण्यानं अक्षरशः लोकांना वेड लावलं आहे. हे गाणं विनोदला अचानक सुचलं. तो राणी सोबत फोनवर बोलत होता. गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात विनोदला जमिनीवर कानातील ज्वेलरी पडलेली दिसली. त्याला काही ठिकाणी झुबे म्हणतात तर अहिराणी भाषेत त्याला झुमका म्हणतात. ते हातात घेतल्यानंतर विनोदला गाण्याची लाईन सुचली “हाई झुमका वाली पोर’ हाय नदी तडीले चालणी,नदी तडीले चालनी,मना राघ्या वाघ्या नी जोडी पाणी पेवाडे तीतडी चालनी..राघ्या वाघ्या ही बैलांची नाव आहेत आणि इथूनच हळूहळू पूर्ण गाण विनोदने बनवलं आणि हिट झालं. या गाण्याचे पूर्ण व्हिडिओ शूटिंग नाशिक जवळील ओझर परिसरात झालं आहे, असं कलाकार विनोद कुमावत याने सांगितलं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.