PNB : पंजाब नॅशनल बँकेत 12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

एप्रिल 4, 2022 6:22 PM

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई या पदांसाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 असणार आहे.

Punjab National Bank Recruitment 2022 jpg webp

कूण जागा : 12

पदाचे नाव : शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना बेसिक इंग्लिश भाषा वाचता येणं आवश्यक आहे.तसंच उमेदवार हे त्या जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचं वय 18 ते 28 च्या दरम्यान असावे

अर्ज करण्यासाठीचा पत्ता :

मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now