जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । जळगाव शहरातील महाराष्ट्र रिक्षा युनियन संघटनातर्फ़े जिल्हाध्यक्षपदी इरफान अब्दुल कैसर शेख, शेख असलम, शेख मुख्तार यांची जळगाव शहराध्यक्ष व अफसर शेख यांची जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे बैठक घेण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सम्मान करण्यात आले. घरकाम महिला संघटनेच्या अध्यक्षा आशा कांबळे, हातगाडी पंचायतचे कोषाध्यक्ष बळीराम काकडे आदी या वेळी उपस्थित हाेते.








