उन्हाळी हंगामातील पिकांसाठी अर्ज करण्याच्या सूचना

एप्रिल 4, 2022 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांच्या अधिपत्याखालील धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागाईतदारांना १ मार्च ते ३० जुन, २०१८ या कालावधीकरिता उन्हाळी हंगाम २०१७-१८ साठी भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकासाठी उपलब्धतेनुसार पाणी देण्यात येणार आहे.

farmar

त्यासाठी लाभ क्षेत्रातील इच्छूक शेतकऱ्यांनी पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात १५ एप्रिल, २०१८ पर्यंत सादर करावेत. असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now