गुन्हेजळगाव शहर

धक्कादायक : सुसाईट नोट लिहून एसटी चालकाची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर एका एसटी चालकाने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. मनस्थिती ठीक नसल्याने कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

शिवाजीनगर अमरधाम समोर खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १०.३० च्या सुमारास घटना गँगमनच्या निर्दर्शनास आली. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना हे पोहचल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली.

रुग्णवाहिका पोहचल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेहाचे खिसे तपासले असता एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून त्यांची ओळख पटली आहे. माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाजी पाटील यांच्या आत्महत्यामुळे जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या आत्महत्येची नोंद झाली आहे.

काय लिहिले आहे सुसाईट नोटमध्ये?

पहा थेट प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/279366054360758

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button