जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । समता नगरात सर्व रोगनिदान शिवीर आयोजित करण्यात आले होते. रोगनिदान शिवीर हे शासकीय आयुर्वेद रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे तर शिवीराचे सर्व आयोजन हे आशितोष बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जनकल्याण युवा फाउंडेशन आणि शिवशक्ती मानव सेवा संस्थान यांनी केले होते.

त्यात मधुमेह, दमा, खोकला, पँरलिसिस,मूळव्याध, मणक्याचे आजार इ. आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली आणि सर्वांना मोफत औषधी देखील देण्यात आल्या. त्यात शासकीय आयुर्वेद रुग्णालय येथील वैद्या शर्मिली सूर्यवंशी, वैद्या स्वाती गायकवाड, वैद्य राजीव टारपे, वैद्य विनायक पाचे, वैदही जोशी आणि सीमा साखरे परिचारिका, हर्षली तायडे आणि धिरज राठोड फार्मासिस्ट, तसेच किसन पावरा लॅब टेक्निशियन उपस्थित होते.

त्यावेळी विकी कलाल, मुकेश शिंदे, मनोज सोनार, बाळा सोनार, किशोर जाधव, गौरव लक्ष्मण सोनवणे आदी. यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू










