शिवाजीनगरात खून : महिलेसह एक संशयीत काही तासात पोलिसांच्या ताब्यात

मार्च 26, 2022 6:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाचा शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात घुसून निर्घुण खून करण्यात आला. घटनेची माहिती कळताच शहर पोलिसांनी धाव घेत पुढील कार्यवाहीला सुरुवात केली. दरम्यान, अवघ्या काही तासात एलसीबीच्या पथकाने महिलेसह एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.

naresh sonavane jpg webp

जळगाव शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या नरेश आनंदा सोनवणे वय-३० या तरुणाचा शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर हुडको परिसरात खून करण्यात आला. घरात घुसलेल्या काही तरुणांनी चॉपरने वार करून नरेशचा खून केला होता. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले होते.

दरम्यान, एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासात रेल्वे स्टेशन परिसरातून महिलेसह आकाश सखाराम सपकाळे या संशयितांना ताब्यात घेतले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now