जळगावच्या छायाचित्रकारांचा नाशिकहून परतताना अपघात, १ ठार, ३ जखमी

मार्च 26, 2022 12:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । शहरातील काही व्यावसायिक छायाचित्रकार नाशिक येथे लग्नाच्या कार्यक्रमाच्या ऑर्डरला गेले होते. लग्न आटोपून जळगावला परतत असताना शनिवारी पहाटे नाशिक-मालेगाव रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Jalgaon photographer accident jpg webp

शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी व क्षण फोटो स्टुडिओचे संचालक निलेश प्रकाश चव्हाण (वय ३२) हे आपल्या चारचाकी गाडी (एमएच २२, डी-४४४४) ने लहान भाऊ व काही सहकाऱ्यांसोबत नाशिक येथे लग्नाचे फोटो काढण्यासाठी गेले होते. शुक्रवारी रात्री सर्व काम आटोपल्यानंतर ते जळगावला येण्यासाठी निघाले होते. रस्त्यात नाशिक ते मालेगाव दरम्यान त्यांचा अपघात झाला.

अपघातात निलेश यांचा लहान भाऊ धनराज उर्फ विक्की चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातात निलेश यांच्यासह विनोद दांडगे, कल्पेश पाटील हे जखमी असल्याचे समजते. छायाचित्रकारांच्या अपघाताने जळगावातील सर्व छायाचित्रकार बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now