अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावचा तरुण ठार

मार्च 24, 2022 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नशीराबादजवळील हॉटेल गारवा समोर घडली. गोकूळ उर्फ आण्णा सुकलाल अडकमोल (वय 38) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

accident jpg webp

काय आहे घटना
याबाबत असे की, जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील नवनाथ नगर येथे गोकूळ अडकमोल हा कुटुंबासह वास्तव्यास होता. तो जळगाव भुसावळ मार्गावर खाजगी प्रवासी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. 18 मार्च रोजी धुलिवंदन असल्याने गोकूळ मित्रासोबत त्याच्या मूळ गावी नशीराबाद गेला होता. तेथून एकटा हॉटेल गारवा येथे आला. याठिकाणी रात्री 11 वाजेच्या सुमारास महामार्गावर पायी चालत असतांना अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहनधारक वाहनघेवून घटनास्थळावरुन पळून गेला होता. हॉटेल गारवा येथील कामगारांसह नागरिकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंत्यविधीसह इतर कार्यक्रम आटोपल्यानंतर बुधवार 23 मार्च रोजी या अपघातप्रकरणी मयत गोकूळ यांचा भाऊ कपील अडकमोल यांनी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन मृत्यूस कारणीभूत अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now