जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । मुलाला का मारले याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या इसमाला झालेल्या बाचाबाचीत एकाने चाकूने भोसकून (murder) खून करण्यात आला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील (Kharjai) खरजईत येथे काल रात्री घडलीय. सतिष साहेबराव सोनवणे (वय-३२) रा. बेघरवस्ती खरजई) असे मयताचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव (police) पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारेकरी घटनास्थवरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
काय आहे नेमकी घटना
गेल्या काही दिवसांपूर्वी खरजई गावातीलच प्रविण उर्फ मोन्या राजू सोनवणे (ह. मु. बायपासरोड चाळीसगांव) याने खरजई गावातील पिंन्टू शिंदे या तरुणास मारहाण केली होती. त्याला मारहाण का केली याची विचारणा सतिष साहेबराव सोनवणे (वय-३२) रा. बेघरवस्ती खरजई) याने प्रविण उर्फ मोन्या सोनवणे याचेकडे काल रात्री केली असता, या कारणावरुन सतिष आणि प्रविण उर्फ मोन्या यांच्यात बाचाबाची सुरु होती. या बाचाबाचीत प्रविण हा शिवीगाळ करीत असतांनाच, सतिष याच्या पत्नीने तु शिवीगाळ का करतो अशी विचारणा प्रविणला करतांनाच प्रविणने तिच्या कानशिलात चापट मारल्याच्या कारणावरुन प्रविण आणि सतिष यांच्यात झटापट सुरु असतांनाच प्रविण याने खिशातील चाकु काढून सतिषच्या पोटात दोनतीन वेळा खोपसला. सतिष रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर प्रविण लागलीच तेथून पसार झाला.
जखमी अवस्थेतील सतिषला चाळीसगांवी ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत (Dead) घोषीत केले. या प्रकरणी मयत सतिषचा भाऊ संजय साहेबराव सोनवणे याचे तक्रारीवरुन शहर पोलीसांत रात्रीच गुन्हा र. नं. ११७/२०२२ कलम ३०२, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या असून आरोपीच्या शोधासाठी सर्वत्र पथके तैनात करण्यात आली असल्याचे (police) पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.