⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

अट्रावलच्या मुंजोबाने घेतला अग्नीडाग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थानावर काल बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुंजोबाने अग्निडाग घेतला. यात्रेनंतर सव्वा महिन्याच्या अवधीतचच मुंजोबाने अग्नीचा घेतला आहे. मुंजोबाने अग्निडाग घेतल्याची माहिती परिसरातील पसरल्यानंतर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अट्रावल येथील खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मुंजोबा ची यात्रा गेल्या महिन्यात माग शुद्ध पंधरवाड्यात पार पडली. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे बंद, असलेली यात्रा यावर्षी कोरोनाचे निर्बंध पाळत हजारो भाविकांनी यात्रा उत्सव काळात दर्शन घेतले यात्रोत्सवात भाविकांनी, मुंजोबास अर्पण केलेली पूजा, पत्री , लोणी यात्रोत्सवानंतर आपोआप पेट घेतात यालाच मुंजोबाने अग्नीडाग घेतल्याचे म्हणतात.

मुंजोबा अग्नीडाग केव्हा घेईल हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही. यावर्षी सव्वा महिन्याच्या अवधीतच मुंजोबाने अग्नीडाग घेतला आहे. अग्नीडाग घेतल्याचे समजताच पंचक्रोशीतील भाविकांनी मुंजोबाच्या दर्शनासाठी धाव घेतली.