⁠ 
रविवार, मे 19, 2024

आमदारांच्या प्रयत्नाने मुख्य रस्त्यांवर लागणार पंधराशे मोठे वृक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२२ । अमळनेर येथील आमदार अनिल पाटील यांनी ठोक अनुदानातून चोपडा, टाकरखेडा व धुळे रस्त्यावर वड पिंपळ आणि लिंबाची दहा फुटावरून अधिक मोठी झाडे लावण्यासाठी साठ लाख रुपयांचा निधी कंत्राटदार प्रभाकर पाटील यांना उपलब्ध करून दिला आहे त्यातून कंत्राटदार सदर झाडांना तीन वर्ष खतपाणी देण्यासह त्यांचे संरक्षणही करणार आहे.

१९ रोजी आमदार पाटील यांच्या शुभहस्ते मंगळग्रह मंदिराजवळ या योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी मोतीलाल जैन, बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, राजू देशमुख, अश्विन चौधरी, देविदास देसले, दीपक पाटील(वावडे), डॉ. संजय पाटील ( खेडी), मनोज बोरसे, आशिष चौधरी, गोरख चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, नरेश कांबळे, सुरेश भावसार, कंजारभाट मित्र मंडळाचे राकेश अभंगे, सनी अभंगे ,सचिन अभंगे, प्रथमेश पवार, अशोक मिस्त्री, नाना पाटील, मंगेश मिस्त्री आदी उपस्थित होते.

मतदारसंघाचा एकूणच चेहरा-मोहरा हिरवागार व मनोहारी होण्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरेल असे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले. योजना कार्यान्वित केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार पाटील यांचा सत्कार केला.