भुसावळात गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद

मार्च 19, 2022 6:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बाळगणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

crime 4 1 jpg webp

शेख सद्दाम शेख गफ्फार (28, जाम मोहल्ला, रजा टॉवर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, मॅग्झीन व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी सचिन पोळ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now