जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । शहरातील नेरीनका चौकात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारसोबत एकाने हुज्जत घालत गैरवर्तन केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. दरम्यान, महिला कर्मचारीसोबत गैरवर्तन करीत असल्याने नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.
शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी गुरुवारी दुपारपासून नेरी नाका चौक येथे कर्तव्य बजावत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सलीम खान अरमान खान पठाण रा.पाळधी हा त्याठिकाणी आला. मनीषा मॅडम यांचा नंबर हवा आहे असे तो विचारणा करू लागला. महिला पोलीस कर्मचारी यांनी नकार दिला असता तो हुज्जत घालू लागला. महिला कर्मचारीने तिच्या काही सहकाऱ्यांना याबाबत कळविले.
सलीम खान याने महिलेचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मी रिपोर्टर असून तुझी नोकरी खातो. तुझा साहेब पण मला सलाम करेल. असे तो सांगू लागला. महिला कर्मचारीने मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिलेचा हात ओढाताण केला.
परिसरात असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनी त्या तथाकथित पत्रकाराला चांगलाच चोप दिला. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक यशोदा कानसे करीत आहे.