वाळूच्या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

मार्च 17, 2022 6:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । भरधाव वेगाने जात असलेल्‍या वाळूच्या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना अमळनेर शहरात आज दुपारी घडली. बापू लोंढू पाटील (वय ४९,रा.ताडेपुरा, अमळनेर) असे मृताचे नाव आहे.

accident jpg webp

काय आहे नेमकी घटना?
अमळनेर (Amalner) शहरातून पारोळ्याकडे जाणाऱ्या वाळूच्या ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर अपघात (Accident) पैलाडजवळील पारोळा रस्त्यावर झाला असून बापू लोंढू पाटील (वय ४९,रा.ताडेपुरा, अमळनेर) असे मृताचे नाव आहे.

बापू पाटील हे दुचाकीने जात असताना मागून वाळूने भरलेला ट्रक (क्र.एमएच.२१-एक्स.८१२८) या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यात बापू पाटील यांचा जागीच (Accident Death) मृत्यू झाला. तर ट्रकचा ड्रायव्हर घटना स्थळावरून फरार झाला. या संदर्भात अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now