जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २७ वर्षीय तरूण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. किशन पंडित सोनवणे (वय-२७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसर हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे नेमकी घटना?
पाचोरा तालुक्यातील ओझर येथील येथे किशन सोनवणे हे वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक लहान भाऊ सह वास्तव्यास आहे. किशन सोनवणे यांनी सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळुन घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना घरात कोणीही नसतांना झाल्याने सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

वृद्ध आई, पत्नी व मुली बाहेरगावी गेलेले असल्यामुळे किशन सोनवणे हे घरी एकटेच होते. अतिशय होतकरू व मन मिळावु स्वभाव असलेले किशन सोनवणे हे आपल्या नावे असलेली एक बिघा शेती सोबतच बाजार समितीमध्ये हमालीचे ही काम करायचे. त्यांच्या अशा अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.










