सुटीचा दिवस असल्यामुळे मित्रांसोबत बंधाऱ्यावर फोटोशूटसाठी गेला अन् घडलं विपरीत

मार्च 14, 2022 12:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । सुटीचा दिवस असल्याने कांताई बंधाऱ्यावर फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. शुभम कांतिलाल चव्हाण (वय १७, रा. वानखेडे सोसायटी) असे मृताचे नाव आहे.

shubham chavhan jpg webp

याबाबत असे की, शहरातील वानखेडे सोसायटीमध्ये राहणार शुभम हा बाहेती महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे शुभम हा मित्र मित चव्हाण याच्यासह काही मित्रांसोबत कांताई बंधारा येथे फोटोशूट करण्यासाठी गेला होता. दुपारी ३.३० वाजता नदीकाठी उभा असताना पाय घसरल्यामुळे तो पाण्यात बुडाला.

पोहता येत नसल्यामुळे एका कपारीत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांनी सायंकाळी सात वाजता मृतदेह बाहेर काढला. रात्री ८.३० वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मृत शुभमच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now