रावेर : संपकरी एसटी चालकाने घेतला गळफास

मार्च 14, 2022 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । रावेर आगारातील संपकरी एसटी चालकाने स्वतःच्या घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. चालक कन्हैया भिका अटकाळे (वय ४७, रा. थेरोळा (ता.रावेर)) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. संपामुळे आर्थिक अडचणीतून आलेल्या नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केली, अशी कुजबूज एसटी कर्मचाऱ्यांमध्ये होती.

st bus lalpari jpg webp

पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये चालक अटकाळे हेदेखील सहभागी होते. त्यामुळे ते कामावर हजर नव्हते, अशी माहिती आगार प्रमुख बेंडकुळे दिली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण रविवारी रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते. याप्रकरणी विशाल अटकाळे यांच्या खबरी वरून रावेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करत आहेत. दरम्यान, मृत चालक कन्हैया अटकाळे यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व एक अविवाहित मुलगा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now