सम्राट कॉलनीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या

मार्च 11, 2022 10:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

jalgaon suicide

प्रशांत रविंद्र मांडोळे (वय-३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. सम्राट कॉलनीत राहणारा प्रशांत मांडोळे हा तरुण एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. प्रशांतचे सम्राट कॉलनी दुमजली घर असून तो ज्या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण खालच्या घरात असतांना प्रशांतने वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली.

प्रशांतने आत्महत्या केल्याचे मोठा भाऊ हेमंत मांडोळे याच्या लक्षात आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडील व नातेवाईकांनी मन हेलवणारा आक्रोश केला. त्याला तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now