भाजप विजयाचा सावद्यात जल्लोष, आमदार महाजनांविषयी निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । सावदा येथे भाजपाने उत्तर प्रदेशसह चार राज्यात मिळवलेल्या यशाबद्दल येथील बस स्टॅन्ड जवळील दुर्गा माता मंदिरा जवळ सायंकाळी 5 वाजता विजयउत्सव साजरा करण्यात आला. त्यांनतर आ.गिरीश महाजन यांच्या विरुद्ध कट रचणाऱ्यांवर कारवाईसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉ. अतुल सरोदे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, पराग पाटील, सचिन ब-हाटे, सागर चौधरी, नेहा गाजरे, गजानन भार्गव, महेश अकोले, संतोष परदेशी, अक्षय सरोदे, नितीन खरे, मुकेश महाजन व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच आमदार गिरीश महाजन यांचे विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून मोक्का लावण्याचा षडयंत्र आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्व प्रकरणाची पोलखोल केली असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीचे निवेदन सावदा पोनी देविदास इंगोले यांना देण्यात आले. यावेळी डॉ. अतुल सरोदे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, सचिव महेश अकोले, पराग पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.