जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । गुरुवारी देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणूक निकालांनंतर कंपन्या दरवाढ करतील अशी अपेक्षा होती मात्र तूर्त कंपन्यांनी वेट अॅंड वाॅचची भूमिका घेतली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १२७ व्या दिवशी पेट्रोल डिझेल कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

विधानसभा निवडणूक (Assembly elections) होताच पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होईल असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र आज देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल, डिझेलवरील टॅक्स कमी करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते, त्यानंतर इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कमॉडिटी बाजारात आज शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव १०८डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे. त्यात किंचित घसरण झाली. दरम्यान गुरुवारी तेलाचा भाव ५ टक्क्यांनी वाढला होता. तेलाचा भाव ११६ डाॅलर प्रती बॅरल इतका वाढला होता.
देशातील बड्या शहरातील दर
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.
आज एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.५३ रुपये इतका झाला. कोलकात्यात मात्र डिझेलचा भाव ८९.७९ रुपयांवर कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.
हे देखील वाचा :
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- UPI पेमेंटच्या नियमांत मोठा बदल; तुमच्या खिशाला नेमकी किती झळ बसणार? घ्या जाणून
- iPhone प्रेमींना मोठा धक्का ! नवीन आयफोन लॉन्च होताच जुने मॉडेल्स झाले महाग
- सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात वाढ
- सर्वसामान्यांना दिलासा! ऐतिहासिक उच्चांकानंतर साखर दरात मोठी घसरण, गूळही झाला स्वस्त..











