⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | .. आणि पराभव पत्करावा लागला ; बोदवडच्या पराभवाचं राष्ट्रवादीनं सांगितलं कारण

.. आणि पराभव पत्करावा लागला ; बोदवडच्या पराभवाचं राष्ट्रवादीनं सांगितलं कारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गाफील राहिलो आणि पराभव पत्करावा लागला

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसने आज जळगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत चिंतन केले. ‘एकनाथराव खडसे राष्ट्रवादी पक्षात आल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी निवांत होते. याचाच फटका बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत बसला. गाफील राहिलो आणि पराभव पत्करावा लागला,’ अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जळगावचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी आज व्यक्त केली. अविनाश आदिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

..आणि त्यामुळंच आमचा घात झाला

पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी बोदवडच्या पराभवाचं विश्लेषण केलं. ‘नाथाभाऊ आणि आम्ही एकत्र आलो. त्यामुळं आम्ही गाफील राहिलो ‍आणि त्यामुळंच आमचा घात झाला, असं स्वत: रवींद्र पाटील यांनी सांगितलंय. त्यातच सगळं आलं, असं आदिक म्हणाले.

दरम्यान, आगामी काळातील निवडणुका या वरिष्ठांच्या आदेशानुसार लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या त्या ठिकाणची पक्षाची ताकद लक्षात घेऊन स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.