चाळीसगावात मनसेतर्फे अनोखा महिला दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला.
चाळीसगाव नगरपालिकेला जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी स्वच्छतागृह उभारावे या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आले. यात प्रामुख्याने चाळीसगाव शहरातील व्यापारी संकुलात मध्ये असलेले शौच्छालय स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच चाळीसगावातील सर्व व्यापारी संकुलआतील शौचालय स्वच्छ करून ते वापरणे योग्य करावे. महिलांसाठी नवीन शौच्छालयाची निर्मिती करण्यात यावी, अशा आशयाचे अनेक मुद्दे मांडण्यात आले.
या प्रसंगी चाळीसगाव मनसे पदाधिकारी संग्रामसिंग शिंदे, अण्णा विसपुते, दीपक पवार, पंकज स्वार, योगेश भाऊ, दर्शन चौधरी, भाऊसाहेब चौधरी, भाईदास बोरसे, पप्पू पाटील, वाल्मीक पाटील उपस्थित होते.