⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जागतिक डॉक्टर डे निमित्त डॉ. बिधानचंद्र रॉय यांना अभिवादन, समर्पित व सेवावृत्‍ती जोपासण्याची घेतली शपथ

जागतिक डॉक्टर डे निमित्त डॉ. बिधानचंद्र रॉय यांना अभिवादन, समर्पित व सेवावृत्‍ती जोपासण्याची घेतली शपथ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । बंगालचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ १ जुलै १९९१ रोजी भारतात प्रथमच ’राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. शिक्षक असण्यासोबतच ते सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही होते.त्यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला. योगायोगाने त्यांचेही १ जुलै (१९६२) रोजी निधन झाले. या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी समर्पित व सेवाभावी वृत्‍ती जोपासण्याची शपथही डॉक्टरांना देण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील,वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. चंद्रया कांते, डॉ. सुभाष बडगुजर,डॉ.अनंत बेंडाळे, डॉ. माया आर्विकर,डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ. मिलींद जोशी, डॉ दिपक अग्रवाल, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख डॉक्टर उपस्थीत होते. यावेळी सर्व वैद्यकिय शिक्षण प्रशिक्षण घेणाऱ्या नविन डॉक्टरांना समर्पित व सेवाभावी वृत्‍ती जोपासण्याची शपथ देण्यात आली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.