उपेक्षित महीला घटकांचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे सन्मान
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । एरंडोल येथे तालुका पत्रकार संघातर्फे जागतिक महीला दिना निमित्त समाजातील उपेक्षित व विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त महीलांचा सत्कार येथील तहसिलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील हे होते.
यावेळी उपस्थित मान्यवर अतीथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतीमांचे पुजन होऊन माल्यार्पण करण्यात आले. कोविड काळात ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणार्या नपा कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच धुणी-भांडी करणारी महीला सोनाली आनंद सैंदाणे, वर्षभर शेतमजूर म्हणुन राबणारी महीला विमलबाई खंडू महाजन, सफाई कामगार म्हणुन रोजंदारीने काम करणारी महीला इंदुबाई रतन खंडारे , स्कूल बस चालक प्रतिभा सोनवणे या तळागाळातील उपेक्षित असलेल्या महीलांना साडी-चोळी व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तर कासोदा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त परीचारीका शोभा पाटील यांचा देखिल भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रविण महाजन यांनी स्वरचित काव्य सादर केले.
संसर्गाच्या भितीच्या सावटामुळे कटुंबातील व्यक्ती देखील जवळ येत नव्हती अश्या वेळी कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतांवर जवळील अंत्यसंस्कार करण्याचे काम जीव मुठीत धरून अहोरात्र करणारे नपा कर्मचारी हरीचंद अटवाल, सचिन पटवणे, शंकर गोयर, मुकेश यादव यांना कपडे देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी तहसिलदार सुचिता चव्हाण, प्रा.स्वाती शेलार, डॉ.रश्मि ठाकुर, शोभा पाटील यांची प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थिती होती. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बी. एस. चौधरी यांनी केले. सुञसंचालन दिनेश चव्हाण व नितीन ठक्कर यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजेंद्र ठाकरे यांनी केले.
शैलेश चौधरी, कुंदन ठाकुर, कैलास महाजन, पंकज महाजन, राजधर महाजन, चंद्रभान पाटील, प्रल्हाद पाटील, पंडीत पाटील, रोहीदास पाटील, गोकुळ शिंपी आदी पत्रकार व अजय महाजन, खुशाल महाजन हे उपस्थित होते. एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी यांनी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात जाऊन महिला अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करुन महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.