जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । शहरातील नेरी नाकाजवळील जानकीनगर मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. बन्सीलाल पांडे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर बालकिसन जोशी असे गंभीर जखमीचे नाव आहे.

काय आहे नेमकी घटना?
जानकीनगरमध्ये आज सायंकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. बन्सीलाल पांडे आणि बालकिसन जोशी हे स्वयंपाकी(आचारी) चे काम करून आपला उदर्निवाह करीत होते. आज सायंकाळी ऑर्डरचे काम करीत असताना अचानक गॅस सिलेंडरने भडका घेतला.

स्फोटासारखा आवाज झाल्याने नागरिकांनी धाव घेतली. घटनेत स्वयंपाकी बन्सीलाल पांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर बालकिसन जोशी गंभीर आहे. यावेळी घरातून आठ सिलेंडर आढळून आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच महापौर जयश्री महाजन यांनी धाव घेत माहिती घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
पहा थेट प्रक्षेपण :










