विद्यापीठात प्रवेश करण्यापूर्वीच नूतन कुलगुरूंच्या ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मने

मार्च 7, 2022 1:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी हे सोमवार दि.७ मार्च रोजी विद्यापीठात पदभार स्विकारायला पोहचले. मुख्य इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी कुलगुरूंनी पायरीच्या पाया पडत वंदन केले. कुलगुरूंच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली गेली आहेत.

kulguru new entry jpg webp

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांची निवड झाल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले. आज सोमवार दिनांक ७ मार्च रोजी दुपारी कुलगुरूपदाचा पदभार स्विकारण्यासाठी प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी हे पोहचले. वाहनातून उतरताच सर्वप्रथम त्यांनी मुख्य इमारतीसमोर नतमस्तक होत खाली वाकून पायरीच्या पाया पडल्या.

कुलगुरूंच्या या कृतीने सर्वच अवाक् झाले असून आपल्या कार्यस्थानाला वंदन करणारे कुलगुरू म्हणून त्यांनी सर्वांची मने जिंकली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात कुलगुरुंचे स्वागत केले. काहींनी बुके देत स्वागत केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सातवे कुलगुरू म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now