जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी तथा जी जी खडसे महाविद्यालयाचा खेळाडू शुभम डापके याची अखिल भारतीय पातळीवर होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव क्रास कंट्री संघात निवड करण्यात आली. हि स्पर्धा दिनांक ९ व १० मार्च २०२२ रोजी मंगळुर विद्यापीठ मंगलौर येथे सपन्न होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ दि. ६ मार्चला रवाना होणार आहे.
महाविद्यालयाच्या क्रिडा संचालिका डॉ. प्रतिभा ढाके यांचे मार्गदर्शन शुभमला लाभले. त्याच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष रोहिणी खडसे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ.सी.एस.चौधरी, संचालक मंडळ, प्रभारु प्राचार्य एच.ए.महाजन, उपप्राचार्य ए.पी.पाटील तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








