⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | एकनाथ खडसेंसह संजय राऊतांच्या फोनचं टॅपिंग, गुन्हा दाखल

एकनाथ खडसेंसह संजय राऊतांच्या फोनचं टॅपिंग, गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर फोन टॅपिंगच्या आरोपाखाली मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा फोन टॅपिंग केला असल्याचा उल्लेख एफआयआर कॉपी मध्ये आहे, अशी माहिती समोर आलीय. दरम्यान, आता यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीय.

राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते.

एकनाथराव खडसे यांचा फोन टॅप करण्यात आला तेव्हा ते भाजपमध्ये होते. यामुळे एकीकडे विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करतांना भाजपमधीलच नाथाभाऊ आणि तेव्हा मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेतील संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप हा राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा ठरला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.