जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतातील अनेक विध्यार्थी अडकले आहे. काही विद्यर्थ्यांना भारतात परत आणण्यात यश आले आहे. तर काही अजूनही अडकून पडले आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेली जळगावची विद्यार्थिनी मायदेशी परतली आहे. बरीरा युसुफ पटेल असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

जळगाव मेहरुण परिसरातील बरीरा युसुफ पटेल नावाची विद्यार्थिनी येथील ओझोड विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत असताना युद्ध भडकल्याने तिला भारतात परत यावे लागले. अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत सरकारच्या सहाय्याने ती दिल्ली दिल्लीवरून मुंबई व मुंबईवरून जळगाव ला बुधवारी राजधानी एक्सप्रेस ने रात्री जळगाव रेल्वे स्टेशन वर आगमन झाले असता तिचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी चे फारुक शेख, ताहेर शेख, जुलकर नैन,अमरुल्लाह सय्यद, शहा बिरादरीचे अनीस शाह, शेख सय्यद बिरादरीचे समीर शेख व काज़िम सय्यद, खाटीक बिरादरीचे यूसुफ ताहेर खाटीक, तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार राजूमामा भोळे, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ राधेश्याम चौधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी तसेच इक़रा महाविद्यालयातील शिक्षक वृंद यावेळी खास उपस्थित होते.
बरीराचे भारत माता की जय घोषणेसह स्वागत
बरीरा पटेल राजधानी एक्सप्रेस ने उतरताच ती यूक्रेन ते जळगाव हिजाब घालून आली व तिचे स्वागत जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे हे करीत असताना त्यांचे कार्यकर्ते भारत माता की जय, वंदेमातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देत असतांना एक चांगला संदेश बघणारे ना जात होता.
सदका देऊन बिरदारीने मानले अल्लाहचे आभार
बरीरा ही सुखरूप परत आल्याने मनियार बिरदारीने सदका (दान) त्याच ठिकाणी उपस्थित गरीब व्यक्तिना देऊन अल्लाह चे आभार मानले.
अल्लाह कड़े विशेष प्राथना
सदर चे युद्ध हे त्वरित थांबावे व निष्पाप लोक जे मृतुमुखि पडत आहे त्यांच्या साठी विशेष प्राथना करण्यात आली












