जळगाव लाईव्ह न्युज | १ मार्च २०२२ | पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. दोघांचा एकमेकांवरचा विश्वास संसाराचा गाडा नीट पेलू शकतो आणि आयुष्याला सुंदर बनवू शकतो. मात्र, अशातच पारोळा शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने आपल्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी पीडीत पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

पारोळा शहरातील २० वर्षीय विवाहित महिलेच्या पतीने हे कृत्य केले. संशयिताने अनैसर्गिक कृत्य करण्यास पत्नीला भाग पाडले, तसेच पत्नीचे अश्लील फोटो काढले. पत्नीने या प्रकाराला विरोध केल्यानंतर तिला घरातून बाहेर काढण्याची धमकीही दिली होती. याबाबत २२ रोजी विवाहिचे नातेवाईक विवाहितेला कार्यक्रमासाठी माहेरी घेण्यासाठी आले होते. त्यावेळी सासरच्या मंडळींनी नातेवाईकांशी भांडण करून विवाहितेला व तिच्या नातेवाईकांना घरातून हाकलून लावले.
त्यानंतर दि.२६ व २७ च्या मध्यरात्री संशयिताने पत्नीचे व स्वत:चे फोटो व्हायरल केले. हे फोटो विवाहितेच्या नातेवाईकांनी बघितले व सासरच्या मंडळींना विचारणा केली. त्यावेळी सासरच्या मंडळींनी तुमच्याने जे होईल ते करा, असे सांगितले. त्यामुळे विवाहितेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










