जळगाव शहर

राज्यपालांच्या आक्षेपार्ह व्यक्तव्याविरुद्ध जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आयोजित औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.राज्यपालांच्या आक्षेपार्ह व्यक्तव्याच्या विरोधात आज जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. पोलीसांनी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करून ताब्यात घेतले आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे कोशारी यांनी म्हंटल

राज्यपालांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. सोमवारी दुपारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जैन हिल्स येथून कार्यक्रम आटपून राज्यपाल विद्यापीठाकडे दुपारी १ वाजता निघणार होते. याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध केला.

राज्यपालाच्या ताफ्यांना कोणतेही व्यत्यय येवू नये म्हणून आकाशवाणी चौकात तैनात असलेले जिल्हापेठ पोलीस कर्मचारी पोलीसांचा बंदाबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button