गुन्हेजळगाव जिल्हाभुसावळ

दोन गावठी पिस्तूल, काडतूससह तरुणाला एलसीबीने पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगुन दहशत पसरविणारा सागर प्रकाश ढिके (वय २१) रा. टाहकळी ता. भुसावळ याला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने अटक केली. दरम्यान त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, व एक जिवंत काडतुस असा एकुण ५९००० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, जळगाव जिल्ह्यात अग्नीशस्त्रासह गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना अग्नीशस्त्र बाळगणारे लोकांची माहीती काढुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यानुसार किरणकुमार बकाले यांना टाहकळी ता. भुसावळ बौध्दवाडयात संशयित सागर ढिके हा त्याचे कवज्यात बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगुन दहशत पसरवित असल्याची गुप्त माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सफी. वसंत ताराचंद लिंगायत, सफो. युनूस शेख, पोहेकॉ. दिपक शांताराम पाटील, साहेबराव चौधरी, महेश महाजन, पोलीस नाईक, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, रविद्रं पाटील, दिपक शिंदे, अशोक पाटील, चालक मुरलीधर बारी या पथकाकांनी ही कारवाई केली.

दरम्यान त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, व एक जिवंत काडतुस असा एकुण ५९००० हजारांचा मुद्देमाल मिळुन आल्याने ते गुन्हयात जप्त करुन आरोपी यास मुददेमालासह वरणगावं पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

Related Articles

Back to top button