जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्हा कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला आहे. कैदी प्रशांत अशोक वाघ याच्याकडे हा मोबाईल आढळून आला असून प्रकरणी त्याच्यासह अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
जिल्हा कारागृहाच्या पाठी मागील भींतीवरून एका अज्ञात व्यक्तीने बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास मोबाईल जिल्हा कारागृहाच्या कोवीड बँरेक व १२ नंब बँरेक मधील भागात फेकला. फेकलेला मोबाईल न्यायालयीन कैद असलेला प्रशांत अशोक वाघ यान उचलला. कैदी प्रशांत वाघ याने १८ नोव्हेंबर रोजी एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटून नेणाऱ्या चार दरोडेखोरांपैकी एक दरोडेखोर आहे.
दरम्यान मोबाईल कैदी प्रशांत वाघ यांच्याकडे आढळून आल्याने जेल पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल हस्तगत केला आहे. जेल शिपाई बुढन भिकन तडवी (वय-३७) रा. जळगाव जिल्हा कारागृह यांच्या फिर्यादीवरून कैदी प्रशांत अशोक वाघ यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरोधात न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत कुमावत करीत आहे.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते