जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहर व तालुक्यातील सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्यांचे अनेक प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले होते. यातील एका प्रस्तावावर गेल्या काही दिवसांपूर्वीच निर्णय होवून सहा महिन्यांसाठी मोहंमद हासीम मोहंमद सलीम शेख (प्रल्हाद नगर, रींग रोड, भुसावळ) या संशयीताला हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी आदेश काढले होते. त्यानंतर तालुक्यातील वराडसीम येथील रमेश तुकाराम शिंदे (34) यास जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकार्यांनी आदेश काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भुसावळ तालुका आदेश
प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी 9 फेब्रुवारी रोजी हे आदेश काढले असून त्याबाबतची प्रत भुसावळ पोलिस उपअधीक्षक, भुसावळ तालुका पोलिस ठाण्याला पाठवण्यात आली असून पोलिस प्रशासनाने त्यादृष्टीने संशयीताला जिल्ह्याबाहेर पाठवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
अनेकांची हद्दपारी होण्याची शक्यता
पोलिस प्रशासनाकडून पालिका निवडणूकीच्या (रिश्रळज्ञर शश्रशलींळेप) पार्श्वभुमीवर हद्दपारीचे अनेक प्रस्ताव तयार करण्यात आले असून काही प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आले आहेत त्यांची चौकशी होऊन काही प्रस्ताव हे निर्णयाप्रत आल्याचे समजते. पोलिसांनी अनेक जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून पाठवले असून आणखी कुणा-कुणाचे हद्दपारीचे आदेश निघतात? याकडे उपद्रवींसह शहर व तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा :
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- चोपड्यात गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात