बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

महिला कंडक्टरला धक्काबुक्की करणी भोवली ; न्यायालयाने तरुणाला सुनावली कारावासाची शिक्षा !

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२३ । कर्तव्यावर असणार्‍या महिला कंडक्टरला धक्काबुक्की करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अमळनेर न्यायालयाने तरुणाला आठ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. रतीक जुलाल बागूल ( वय २३, रा. कमळगाव, ता. चोपडा) असे आरोपीचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?
महिला कंडक्टरने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या त्यांच्या कर्तव्यावर असताना त्यांना दिनांक ०४.०१.२०२२ रोजी अडावद पिंप्री या बस वर नेमनुक करण्यात आली होती. त्या अडावद बस स्थानकातुन सकाळी बस क्रमांक एम.एच.२० बि.एल १४०६ यावरील चालक नशीर बशीर शेख यांचे सह पिंप्री गांवी जाण्याकरीता प्रवासी घेवुन निघाल्या होत्या.

दरम्यान, संबंधीत बस कमळगाव येथे असताना फिर्यादी हया एका इसमाजवळ टिकीट बुकींग साठी गेल्या तेंव्हा तो इसम त्यांचे मोबाईलवर गाणे मोठया आवाजाने वाजवत होता. तेंव्हा फिर्यादी यांनी त्यांस तिकीटाबाबत विचारणा केली याप्रसंगी त्याने हुज्जत घातली. फिर्यादी या बसच्या दरवाज्या जवळ उभ्या असतना आरोपी रतीक जुलाल बागूल याने मागुन येवुन फिर्यादीस जोरात धक्का देवुनल बस खली ढकलल्यामुळे फिर्यादी या बसच्या खाली जाऊन पडल्या व त्यानंतर आरोपी यांने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व फिर्यादी यांचे कानाखाली मारले हा प्रकार पाहुन बस वरील चालक नसिक शेख हे बसच्या खाली उतरुन आले व आरोपी यांस विचारणा केली की तुरू फिर्यादी बस वाहक यांना का मारले याचा राग येवुन आरोपी याने चालकास देखील मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावरून फिर्यादीने आरोपी विरुध्द वर नमुद कलमा प्रमाणे अडावद,पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. सदर खटला अमळनेर न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश १ पी. आर. चौधरी यांच्यापुढे चालला. यात सहायक सरकारी वकील म्हणून के. आर. बागूल यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. यात पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत बुधा पाटील यांची साक्ष देखील घेण्यात आली. या खटल्यात न्यायमूर्तींनी संशयित रतीक जुलाल बागूल ( वय २३, रा. कमळगाव, ता. चोपडा ) याला भादंवि कलम ३३२ अन्वये आठ महिन्यांची शिक्षा; कलम ३५३ अंतर्गत आठ महिन्यांची शिक्षा ठोठावली. या शिक्षा त्याला एकत्रीतपणे भोगावयाच्या आहेत.